ओबीसींसाठी 25 जागा आरक्षित
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 29, 2022
- 566
13 महिला तर 12 पुरुषांना आरक्षणाचा लाभ
नवी मुंबई ः गेल्या अडीच वर्षापासून विविध कारणाने पुढे ढकलल्या जाणार्या पालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. समर्पित आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार, नवी मुंबईत 20.5 टक्के ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. त्यानुसार 122 सदस्य सोडतीपैकी 25 जागा ओबीसी उमेदवारांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यातील 13 जागा स्त्रिया व 12 जागा पुरुषांसाठी राखीव असणार आहेत. यापूर्वी काढलेल्या अनुसूचित जाती व जमातीसाठी निश्चित करण्यात आलेल्या 13 जागांचे आरक्षण कायम ठेवण्यात येणार आहे.
कोरोना, ओबीसी आरक्षण, प्रभागरचना पद्धती अशा विविध कारणांमुळे अडीच वर्षांपासून नवी मुंबई महापालिका निवडणुक झालेली नाही. मात्र निवडणुकीची तयारी पालिका व उमेदवारांकडून सुरुच होती. अडीच वर्षात तीनवेळा आरक्षण सोडत काढण्यात आली. आता बांठिया आयोगाच्या शिफारसी मान्य करुन ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत शुक्रवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडली. यामध्ये बांठिया आयोगाच्या अहवालानुसार, नवी मुंबईत 20.5 टक्के ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. त्यानुसार 122 जागांपैकी 25 जागा ओबीसी उमेदवारांसाठी आरक्षित असतील. 25 मधल्या 13 जागा महिलांसाठी तर 12 पुरुषांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यापुर्वी काढलेली अनुसूचित जाती व जमातीसाठीच्या 13 जागांची आरक्षण सोडत कायम ठेवत 109 जागांसाठी नव्याने आरक्षण काढण्यात आली. खुल्या प्रवर्गासाठी आता 122 पैकी 84 जागा राहणार आहेत. तर, 61 जागा महिलांसाठी असणार आहेत. 61 जागांमध्ये अनुचुसित जाती, 1 अनुसुचित जमाती, 13 ओबीसी तर 41 सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
बहुसदस्य पद्धतीने आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 122 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाविना आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रर्वगासाठी 11 तसेच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी दोन व सर्वसाधारण 109 अशी एकूण 122 जागांची विभागणी करण्यात आली होती. आता न्यायालयाने मान्य केलेल्या बांठिया आयोगाच्या अहवालानुसार, 122 पैकी 25 जागा मागास प्रवर्गासाठी तर 84 जागा सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. यामुळे आता खर्या अर्थाने नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या कामांना वेग आला असून उमेदवारांचीही जोरदार तयारी सुरु झाली आहे.
समर्पित आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण
- 1राज्य मागास वर्ग आयोगाची जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निहाय ओबीसींच्या लोकसंख्येचा अभ्यास करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चित करणे व विशेष आदीवासी बहुल जिल्ह्यात ओबीसी आरक्षण कमी करण्याची तसेच जेथे पेसा कायदा लागू असेल तेथे ओबीसी आरक्षणाची अमंलबजावणी करता येणार नाही अशी शिफारस
- 2समर्पित आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांचा सर्र्वे करुन राज्य मागास वर्ग आयोगास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्या-त्या प्राधिकरणाच्या क्षेत्रात असलेल्या ओबीसी लोकसंख्येच्या अनुषंगाने हे आरक्षण प्रस्तावित
- 3समर्पित आयोगाच्या अहवालानुसार नवी मुंबई महापालिकेला ओबीसींसाठी 20.5 टक्के आरक्षण मिळाले असून त्यामुळे यापुर्वी असलेल्या 30 जागांऐवजी यावेळी 25 जागांचे आरक्षण
- 4 राज्यातील 23 महापालिकांपैकी 15 महापालिकांमध्ये 27 टक्के, तीन महापालिकांमध्ये 20 टक्क्यांहुन कमी, पाच महापालिकांमध्ये 25 टक्क्यांहुन कमी ओबीसी आरक्षण
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai