Breaking News
नवी मुंबई : पाच दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनासाठी शहरातील लहान मोठ्या बाजारपेठा सजल्या आहेत. विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून खरेदी करताना बहिणींचा मात्र चांगलाच गोंधळ उडत आहे. पारंपारिक राख्यांपासून फॅन्सी अशा सर्वप्रकारच्या राख्या बाजारात आल्या असल्या तरी भाऊरायासाठी रेशमी धाग्यापासून बनलेल्या व खड्यांच्या राख्यांना जास्त पसंती दिली जात आहे. यंदा राखीच्या भावात 15 टक्के वाढ झाली आहे. पाच रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत.
राखी पौणिमेच्या 15-20 दिवस अगोदरच बाजार राख्यांनी रंगीबेरंगी झालेला असतो. लहानांच्या डोरेमॉन, टेडीबेअर, बाल गणेश, बेबी हनुमान अशा राख्यांपासून ते खड्यांच्या फॅन्सी, गोंड्यांच्या राख्या बहिनींचे लक्ष वेधून घेत आहेत. तर्हेतर्हेच्या राख्या असल्याने ही घेऊ की ती असा गोंधळ उडत आहे. तसेच बाजारात प्रथमच अॅक्सेसरीजच्या राख्या आल्या आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेल्या राख्या, राजमुद्रा, तलवार असलेल्या राख्यांना बच्चे कंपनीकडून पसंती मिळत आहे. यंदा रक्षाबंधनसाठी पारंपरिक गोंड्याच्या, लोकरीच्या राख्यांबरोबरच फॅन्सी राख्यांनी समस्त बहिणींना भुरळ घातली आहे. खड्यांच्या राख्यांनाही भरपूर मागणी आहे. बाजारात चांदीच्या राख्याही उपलब्ध आहेत. विविध राख्या असल्या तरी रेशमी धाग्यापासून तयार केलेल्या राखीला जास्त पसंती मिळत आहे.
या राख्यांची किंमत पाच रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे. बच्चे कंपनीची पसंती लक्षात घेऊन डोरेमान, मोटूपतलू, क्रिश यांसह खेळण्यांचा कॉम्बो पॅक असलेल्या आकर्षक इलेक्ट्रॉनिक राख्याही बाजारात आल्या आहेत. 60 ते 80 रुपयांपर्यंत या राख्या उपलब्ध आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस