आ. मंदाताई म्हात्रे यांच्यावतीने भव्य तिरंगा महोत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2022
- 944
12 ते 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बेलापुर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यावतीने 12 व 14 ऑगस्ट रोजी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान साजरा करण्यात येणार आहे. सदर महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक कलाकार उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देणार आहेत. प्रभात फेरी, बईक रॅली, भव्य तिरंगा यात्रा, मौन यात्रा अशा विविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आ. मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावयाचा असून दि. 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत घरोघरी तिरंगा उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावा असे आवाहन आ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. बेलापुर विधानसभा क्षेत्रातील झोपडपट्टी क्षेत्र, विविध सोसायट्या, लोक वसाहती या सर्वांनी ध्वज फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान राखला जाईल याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी असेही आ. म्हात्रे यांनी सांगितले आहे.
आ. मंदा म्हात्रे यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या तुर्भे येथी भाजपा कार्यालयापासून ‘प्रभात फेरी’ काढण्यात येणार आहे. 13 ऑगस्ट रोजी सायं 5 वा. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथून नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ‘बाईक रॅली’ काढण्यात येणार असून सायं 6 वा. वाशी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. श्री. गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार, एनआरआय सागरी पोलीस ठाणेसमोर, पामबीच मार्ग सीबीडी बेलापुर येथे ‘भव्य तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रेमध्ये विविध क्षेत्रातील कलाकार उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देणार असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या युगपुरुषांचे पात्र हे प्रमुख आकर्षण असणार आहे. सायं 5 वा. विभाजन विभिशिका स्मृती दिना निमित्त नेरुळ से 2, राजीव गांधी ब्रिज व सानपाडा से 7 पोलीस चौकी येथे ‘मौन यात्रा’चे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक संस्था, महिला बचत गट, युवा वर्ग व विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवून स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करावा असे आवाहन आ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai