वाहतूक पोलिसांनी 151 सायलेन्सर केले नष्ट
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 19, 2022
- 576
नवी मुंबई : मोठ्या कर्णकर्कश आवाज करणार्या बाईक चालवण्याची फॅड तरुणांमध्ये दिसून येते. मात्र या सायलेन्सरच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण व नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने या गाडयांना अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी देखील कर्णकर्कश आवाज करणार्या दुचाकी वाहनावर कारवाई करुन त्यांचे सायलेंसर जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या 151 सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्याची कारवाई वाहतूक पोलीसांनी केली. यावेळी वाहतूक शाखेच्या सर्व युनिटचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
बुलेट गाडीला कंपनीकडून लावण्यात आलेले सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणारे सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात होत्या. त्याची दखल घेऊन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर लावण्यात आलेल्या दुचाकीवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने नवी मुंबईच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून 151 दुचाकी वाहनाचे सायलेन्सर कापून जप्त केले आहेत. या 151 सायलेंसरवर शनिवारी वाशी रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले. गत जुन महिन्यात देखील वाहतुक विभागाने सीबीडी बेलापुर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर 82 सायलेंसरवर अशाच पद्धतीने रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले होते.
ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असून ही कारवाई टाळायची असल्यास, ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर लावून घेतले आहेत, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत. अशा पद्धतीचे सायलेन्सर बसवून देणाऱया गॅरेजवाल्यावर देखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai