ऐरोलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 07, 2022
- 737
नवी मुंबई ः पालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली विभागांतर्गत सेक्टर 03 ऐरोली येथील घर क्रमांक 370 ऐरोली गांव येथे कॉलमचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले होते. या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमे अंतर्गत हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले असून या मोहिमेसाठी ऐरोली विभागातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार तैनात होते. त्याचप्रमाणे या मोहिमेकरीता 13 मजूर, 01 पोकलेन, 02 गॅस कटर, 06 इलेक्ट्रीक हॅमर यांचा वापर करण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai