Breaking News
13 विधानपरिषद सदस्यांची समिती गठित
नवी मुंबई ः राज्यात परप्रांतीय मासे विक्रेत्यांची संख्या वाढत असून विनापरवाना हा व्यवसाय सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नवी मुंबईत याचे प्रमाण जास्त असल्याने या विनापरवाना परप्रांतीय मासेविक्रेत्यांना प्रतिबंध घालण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी 13 विधानपरिषद सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात रमेश दादा पाटील व इतर विधान परिषद सदस्यांनी नवी मुंबईत परप्रांतीयांकडून परवाना नसतानाही मच्छिविक्री होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असून समितीने शासनाला शिफारशी सादर कराव्यात असे निवेदन केले होते. त्यानुसार मत्यव्यवसाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र विधानमंडळ सचिवालयाने 13 विधानपरिषद सदस्यांची नावे पाठविली. या 13 सदस्यांपैकी 10 सदस्यांच्या नावाचा समावेश यापुर्वीच केला आहे. उर्वरित 3 सदस्यांचा समावेश करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 13 सदस्यांची समिती गठित झाली असून परप्रांतिय विनापरवाना मच्छीविक्रेत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना राबिवण्यात येणार आहेत. त्यामुळे अवैध मासेविक्रि करणार्या परप्रांतियांना चाप बसणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस