Breaking News
कार्यवाहीसाठी समिती गठित
मुंबई ः राज्यातील मेट्रो स्टेशन, एस.टी.डेपो व शहर वाहतुक डेपो विकसीत करुन त्यावरील अतिरिक्त जागेचा वापर पोलीस निवासस्थानासाठी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात अधिक अभ्यास करुन कशापद्धतीने हा प्रकल्प अमंलात येईल यासाठी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
राज्यभरात विविध ठिकाणी पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने आहेत. मात्र वेळेवर त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांची दुरावस्था झाली आहे. असलेली निवासस्थानेही अपुरी असल्याने पोलीसांना कामापासून दूरवरच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते. पोलीसांची 12 तास ड्युटी असून सणासुदीत जास्त वेळ कामावर हजर राहावे लागते. या सर्व कामाच्या व्यापात जर कामापासून जवळच्या अंतरावर घर असेल तर त्यांचा प्रवासात खर्च होणार वेळ, पैसे आणि श्रम यात बचत होऊ शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणापासून जवळच शासकीय निवासस्थान असावे याकरिता ‘पोलीस गृहनिर्माण’ विषयासंदर्भात 27 जुलै 2022 मध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यात घेतलेल्या निर्णयानुसार मेट्रो स्टेशन, एस.टी.डेपो व शहर वाहतुक डेपो विकसीत करुन त्यावरील अतिरिक्त जागेचा वापर पोलीस निवासस्थानासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अपर मुख्य सचिव (परिवहन) गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य सचिव यांनी आवश्यकतेनुसार वेळोवेळी बैठकीचे आयोजन करावे. पुनर्विकासास गती देण्यासाठी उपाययोजना करावयाची आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस