शिवतीर्थावर शिवसेनाच
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 23, 2022
- 681
मुंंबई ः दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान देण्यासाठी मुंबई महापालिकेने शिवसेना व शिंदे गटाला परवानगी नाकारली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजुने याचिका दाखल केली होती. शुक्रवारी यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळुन ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरेंनी मैदान जिंकले असून परंपरेनुसार यंदाही दसर्याला शिवतीर्थावर ठाकरेंच्या शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरुन गेले अनेक दिवस राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट दोघांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. मात्र कायदा सुव्यस्थेचे कारण देऊन पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टात शुक्ररारी दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गटाच्यावतीने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका आमदार सदा सरवणकर यांनी केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा मोठा दणका बसला. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना हायकोर्टात रंगला. पालिकेने कायद्यानुसार निर्णय घेतलेला नाही असं सांगत कोर्टाने पालिकेलाही फटकारले आहे. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होतंय, असं हायकोर्ट म्हणाले. तिन्ही बाजूचे दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या पारड्यात टाकला. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे.
66 पासून आमचा विजया दशमीचा मेळावा होतो. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. दसरा मेळाव्याला उत्साहात या, वाजत गाजत या, पण आपल्या पंरपरेला कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या. - शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai