Breaking News
पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी ; निधी वितरीत करण्याचे आदेश
नवी मुंबई ः फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 12 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नवी मुंबईत संपन्न होणार आहेत. यासाठी यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. हे सामने पाहण्राकरिता जगभरातून रेणार्रा फुटबॉल खेळाडूंच्रा व क्रीडारसिकांच्रा सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानेही कंबर कसली आहे. सुरक्षाविषयक बाबींसाठी 24 लाख 53 हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी पाठवला होता. त्याला बुधवारी शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार सदर निधी वितरीत करण्यात येणार आहे.
11 ते 30 ऑक्टोबर भारतामध्रे होत असलेल्रा 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 रामधील महत्वाचे 5 सामने सेक्टर 7, नेरुळ नवी मुंबई रेथील डॉ. डी.वार.पाटील स्टेडिरममध्रे 12, 15, 18, 21 व 30 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहेत. रा अनुषंगाने रजमान शहर म्हणून करावराच्रा तरारीसाठी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणे सज्ज झाली आहेत. महापालिका, वाहतुक विभाग, पोलीस आयुक्तालय, अग्निशमन विभाग, विद्युत विभाग सर्वांनी आपल्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. रा जागतिक स्पर्धेमध्रे अमेरिका, मोरोक्को, ब्राझिल, जर्मनी, नारजेरिरा, चिली, न्रुझिलंड, स्पेन, कोलंबिरा, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिरा, कॅनडा, फ्रान्स आणि रजमान भारत अशा 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातून नागरिक सामने पाहण्यासाठी नवी मुंबईत येणार आहेत. या सर्वांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कामाला लागले आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ती सुरक्षा व इतर सुरक्षाविषयक सहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्यामार्फत प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्याअनुषंगाने काही खर्चाच्या बाबींसंदर्भात तसेच सुरक्षाविषयक बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करता प्रस्तावातील काही खर्च कमी करण्यासंदर्भात नवी मुंबई आयुक्तालय यांचेकडे विचारणा करण्यात आली होती. त्याअनुंषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी शासनास सादर केलेला सुधारीत प्रस्ताव शासनाने बुधवारी मंजुर केला. त्यानुसार संबंधित विभागास 24 लाख 53 हजार 220 इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यामध्ये 13 लाखांचे साहित्य भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. यात 42 डोअर फे्रेम मेटल डिटेक्टर, 42 हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, 5 एक्सरे बॅग स्कॅनर यांचा समावेश आहे. तर उर्वरित 7 लाख 80 हजारांची साधनसामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. यात 10 हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, मेघ फोन 5, फुडन फ्रिस्किंग स्टॅण्ड 20, लेडीज फ्रिस्किंग बुथ 10, ट्रॉली मिरर मॉडेल 4, प्लॅस्टिक बॅरिकेडॉस 130 यांचा समावेश आहे. यावर 18 टक्के जीएसटीसह एकूण 24 लाख 53 हजार 220 रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांना नियंत्रण अधिकारी व उप संचालक, क्रिडा व युवक सेवा, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस