वृक्षतोडीबाबत नोव्हेंबरला सूनावणी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2022
- 656
नवी मुंबई ः महापालिका महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शन पर्यंत बांधत असलेल्या उड्डाणपुलाने बाधित होणार्या वृक्षतोडीबाबत 9 नोव्हेंबरपासून सूनावणी घेणार आहे. याबाबत पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाने संबंधितांना नोटीसा पाठवल्या असून सूनावणीस हजर राहण्यास सांगितले आहे.
वाहतुक कोंडीचे कारण देवून ती सोडविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका 361 कोटी रुपये खर्च करुन महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शन पर्यंत उड्डाणपुल बांधणार आहे. या पुलासाठी 6 झाडे तोडण्यात येणार असून 384 झाडांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या पुलामुळे 384 झाडे बाधित होणार असून त्याची पुर्नरोपणासाठी पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाने नागरिकांकूडन सूचना व हरकती मागवल्या आहेत. हा उड्डाणपुल लवकरात लवकर व्हावा म्हणून मंत्रालयातून पालिकेवर दबाव असून नवीन सरकार स्थिर झाल्यामुळे इतके दिवस बासनात बांधून ठेवलेला वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाने बाहेर काढला आहे.
ही वृक्षतोड होवू नये म्हणून नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर सूचना व हरकतींचा वर्षाव महापालिकेवर केला आहे. पर्यावरणप्रेमी आणि काही सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवला असून राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे. या उड्डाणपुलास माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी प्रचंड विरोध केला असून पर्यावरण कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले आहे. या पार्श्वभुमीवर वृक्षप्राधिकरण नवी मुंबईकरांच्या भावनांचा कितपत आदर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai