Breaking News
पनवेल ः पनवेल महानगरपालिकेत काम करणार्या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचार्यांचा टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात येत आहे. यापुर्वी एकूण 288 कर्मचार्यांचा विविध पदावरील समावेशनास शासनाने मंजूर दिली आहे. आता टप्प्या 3 मध्ये 23 ग्रामपंचातीमधील सद्यस्थितीमध्ये एकूण 32 कर्मचार्यांचा पालिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा महापालिकेत समावेश करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मोठ्या विलंबानंतर 25 जानेवारी 2019 रोजी कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला यांदर्भातील अहवाल दिला. पहिल्या टप्प्यात 105 कर्मचार्यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला. दुसर्या टप्प्यात 183 अशा एकूण 288 कर्मचार्यांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. टप्प्या 1 व 2 मध्ये समाविष्ट करण्यात न आलेल्या पालिकेत समाविष्ट करावयाच्या महसुली गावांमधील ग्रामपंचायतीच्या आस्थापनेवरील कर्मचार्यांच्या सेवा संबंधितांच्या मुळ नियुक्तीच्या, वेतनाच्या, वयाचे, शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र, दस्तऐवज तपासणी करुन पालिका आस्थापनेवर समाविष्ट करणे आवश्यक होते. त्यानुसार शासनाने टप्पा 3 मध्ये 32 कर्मचार्यांना पात्र ठरवले आहे. त्यांचा समावेश पनवेल महापालिकेच्या सेवेत करण्यास 3 नोव्हेंबरच्या शासनानिर्णयानुसार मंजुरी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस