पाच पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2022
- 705
नवी मुंबई : राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी राज्यातील पोलीस आयुक्त, सह आयुक्त अशा 104 जणांच्या बदल्या केल्या. त्यात नवी मुंबईतील पाच पोलीस उपआयुक्तांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस दलातील 6 पैकी 5 उपायुक्तांच्या एकाचवेळी बदल्या होण्याचा हा पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे.
राज्यातील अनेक शहरातील पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्तांचा कार्यकाळ संपल्याने ते बदलीस पात्र झाले आहेत. मात्र काही ठराविक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्याची मानसिकता शिंदे-फडणविस सरकारची झाली नसल्यामुळे किंबहुना त्यांच्यात एकमत होत नसल्याने त्यांच्या बदल्या होत नसल्याचे बोलले जात आहे. राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा राज्यभरातील शंभरहून अधिक उपायुक्त आणि अधिक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे (मीरा-भाईंदर), वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड (मुंबई शहर), विशेष शाखेच्या उपायुक्त रुपाली अंबुरे (ठाणे शहर), परिमंडळ-2 चे उपायुक्त शिवराज पाटील (ठाणे शहर) तसेच मुख्यालयाचे उपायुक्त अभिजित शिवथरे (जालना) यांचा समावेश आहे. तर नवी मुंबईत बदलुन येणार्या पोलीस उपआयुक्तांमध्ये अमित काळे, पंकज डहाणे, संजय सुरगौडा पाटील व योगेश चव्हाण या चार अधिकार्यांचा समावेश आहे.
दरम्यान, 104 पोलीस उप आयुक्तांच्या झालेल्या बदल्यांपैकी 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगिती देत त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे आदेश राज्यशासनाने मंगळवारी जारी केले आहेत. या 9 अधिकार्यांमध्ये नवी मुंबईत बदली करण्यात आलेले पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबईत 2 पोलीस उपायुक्तांच्या जागा रिक्त राहणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai