Breaking News
282 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी
नवी मुंबई ः नवी मुंबईत सीबीडी बेलापूर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नव्याने उभारण्यात येणार्या नियोजित 12 मजली इमारतीच्या बांधकामास बुधवारी राज्य सरकारने मान्यता दिली. या इमारतीसाठी 281 कोटी 25 लाख रुपयांचा प्रस्ताव उच्चाधिकारी सचिव समितीच्या मान्यतेसाठी ठेवला होता. मुळ प्रशासकीय मान्यता रद्द करुन नव्याने सादर केलेल्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
कोकण भवन इमारतीला लागून असलेला 4757.44 चौ. मीचा भूखंड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियोजित इमारतीसाठी देण्यात आला आहे. 2019 मध्ये या इमारतीच्या बांधकामासाठी 97 कोटी 46 लाख 95 हजार 504 रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. मात्र या खर्चात संरक्षक भिंत बांधण्याचा समावेश असल्याने ही मान्यता नंतर रद्द करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 29 एप्रिल 2022 च्या पत्रान्वये बांधकामक्षेत्रात झालेली वाढ विचारात घेऊन नियोनित इमारतीच्या बांधकामासाठी रु.291,18,58,000 इतक्या सुधारीत अंदाजपत्रकाचा प्रस्ताव शासनास सादर केला. सदर प्रस्ताव 11 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीमध्ये मान्यतेस्तव ठेवण्यात आला असता या कामासाठी केवळ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून, त्या अनुषांगने काही खर्च करण्यात आला आहे. तथापि, प्रत्यक्ष बांधकामाचे काम हाती घेतले नसल्याने या कामाची मूळ प्रशासकीय मान्यता रद्द करुन रु.282.25 कोटी इतक्या रकमेच्या प्रस्तावास समितीने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या संदभातील मुळ प्रशासकीय मान्यता रद्द करून सदर इमारतीच्या बांधकामासाठी रू.282.25 कोटी इतक्या रकमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस