पालिकेच्या पथकावर भिकार्यांची दगडफेक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 12, 2022
- 433
उड्डाणपुलांखाली वाढली मुजोरी
नवी मुंबई ः शहरातील अनेक उड्डाणपुलांखाली, मोकळ्या जागांवर बेघरांनी आश्रय घेतला आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरत आहे. विशेष करुन सानपाडा उड्डाणपुलाखाली हे भिकारी व बेघर तळ ठोकून आहेत. याठिकाणी उंच कुंपनही पालिकेने घातले आहे. तरी ते न जुमानता त्यांनी तेथे आश्रय घेतला आहे. याठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर या बेघरांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या बेघरांची मुजोरी वाढल्याने परिसरात ये-जा करणार्यांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे.
स्वच्छ नवी मुंबईकडे वाटचाल सुरु असतानाच उड्डाणपुलाखालील भिकार्यांच्या दैनंदिन कार्य उघड्यावर सुरु असल्याने परिसराला अस्वच्छतेचे ग्रहण लागत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा उड्डाणपुलाखाली जागेवर अनेक वर्षांपासून भिकार्यांनी तळ ठोकला आहे. त्यांच्यावर अनेकदा पालिकेने कारवाई केली मात्र पुन्हा काही तशीच जैसे थेच परिस्थिती होते. यावर उपाय म्हणून पालिकेने या उड्डाणपुलाखाली लाखो रुपये खर्च करुन उंच लोखंडी कुंपन लावले आहे. तरीही त्यावर चढून, कुंपन तोडून या भिकार्यांनी सदर जागेत शिरकाव केला आहे. बुधवारी पथकाने त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातील काही जणांनी या कर्मचार्यांवर दगडफेक केली. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. तसेच हे भिकारी पैसे मागताना पाठलाग करतात या भिकार्यांची अशी मुजोरी वाढल्याने असुरक्षततेचा भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai