नवघर ग्रामस्थांचा 15 नोव्हेंबरला उपोषण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2022
- 603
उरण ः उरण तालुक्यातील नवघर गाव व गाव परिसरातील विविध समस्या व ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात मागील गेल्या दहावर्षापासून रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील आणि मर्मगंध पाटील या पितापुत्रांनी सातत्याने अर्ज विनंत्या करूनसुद्धा सिडको प्रशासनाला जाग येत नाही. सिडको प्रशासनाने जाणून बुजून नवघर ग्रामस्थांच्या समस्या व मागणीकडे दुर्लक्ष केल्याने नवघर ग्रामस्थ 15 नोव्हेंबर 2022 रोजी द्रोणागिरी सिडको येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा सिडको विरोधात उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
अनेक अर्ज विनंत्या करून सिडको प्रशासनाला जाग येत नाही. म्हणून 6 जून 2022 रोजी नवघर ग्रामस्थांचे प्रा.एल.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्याने होऊ घातलेल्या नवघर रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन हेच नाव देण्यात यावे, नवघर ते नवघरफाटा रूग्णवाहीका तसेच छोटी वहाने येण्या-जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग रस्ता करणे,मौजे नवघर येथे होणा-या रेल्वे स्टेशनमध्ये निर्माण होणार्या नोकर्या आणि व्यवसायामध्ये स्थानिक मौजे नवघर सिडको प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य द्यावे तसेच इतर मागण्यांसाठी द्रोणागिरी नोड सिडको कार्यालय बोकडवीरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी द्रोणागिरी नोडचे अधिकारी नहाने यांनी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी सेवतकर यांच्या सोबत ऑन स्पीकर फोनवर प्रा.एल.बी.पाटील सहीत नवघर ग्रामस्थांची चर्चा घडवून दिली असता प्रा.एल.बी.पाटील यांनी येथील रेल्वे स्टेशनमुळे उद्भवणार्या समस्या सिडकोचे वरिष्ठ अधिकारी सेवतकर यांना समजावून सांगितल्या असता नवघर ग्रामस्थांची सिडकोच्या वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वे प्रशासनासोबत सयुक्त बैठक घेऊन योग्यच निर्णय घेण्याचे मान्य केले केले होते. सिडको आधिकारी सेवतकर आणि नहाने यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आले असता जर 15 सप्टेंबर 2022 पर्यंत ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन जर योग्य निर्णय दिला नाही ग्र आंदोलन करणार असे ग्रामस्थांनी सांगितले होते. असे असताना लाक्षणिक उपोषणाच्या वेळी झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेचा सिडको प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. ग्रामस्थांना सिडको व रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही योग्य ते प्रतिसाद अजूनही मिळाला नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी पुन्हा जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवघर ग्रामस्थांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी ठिक 10.30 वाजल्यापासून द्रोणागिरी नोड, सिडको कार्यालय बोकडवीरा येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai