दूध पुरवठा करणार्यांना मारहाण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 15, 2022
- 576
नवी मुंबई ः राज्य सरकारने शेतकर्यांसाठी पिकेल तिकडेच विकेल या धोरणावर खुली बाजारपेठा केली आहे. मात्र घाटमाथ्यावरुन नवी मुंबई व पनवेलमध्ये दुध विकणास येणार्यांना मारहाण, शिविगाळ होत असल्याचा प्रकार घडत आहे.
नवी मुंबई व पनवेलकरांना सातारा, पुणे व नाशिक येथील दुध व्यवसायिक दुधाचा पुरवठा करतात. मात्र लाखो रुपयांची उलाढाल होणार्या नवी मुंबईतील दुधपुरवठ्याच्या व्यवसायावर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी दुध पुरवठा करणार्यांना मारुन व धमक्या देऊन हा व्यवसाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न सूरु आहे. 7 नोव्हेंबरला बेलापूर येथील सेक्टर 20 मधील श्रीराम मंदीराजवळ श्रीनाथ डेअरीच्या येथे 6 जणांनी दुध पुरवठ्यासाठी आलेल्या योगेश माने या वाहनचालकासह राजा यादव आणि उमाशंकर यादव याला मारहाण केली. त्यावेळी खांदेश्वर येथील ओंकार गावडे याला सोडणार नाही असेही धमकावले.
या घटनेबाबत एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच 11 नोव्हेंबरला कळंबोली येथील रोडपाली परिसरात सकाळी नऊ वाजता देवनारायण डेअरीसमोर उमेश गावडे हे दुधाचा टॅकर घेऊन जात असताना तो टँकर दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी अडविला. उमेश यांना मारहाण व शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच 31 ऑक्टोबरला नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ विद्यालयासमोर ओंकार गावडे यांचा दुधटँकर या मार्गाने जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दुकलीने वाहनावरील कर्मचारी मुकेश राजभर व आप्पासो सुर्वे यांना शिवीगाळ करुन धमकविण्यात आले. दुध विक्री या परिसरात करु नको अशी धमकी दुकलीने देऊन तेथून ही मंडळी पसार झाली. या तीनही घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai