सिडको ग्राहकांना रेराचा फायदा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2022
- 713
नवी मुंबई ः नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 64 हजार घरे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या घरांच्या विक्रिसाठी सिडकोने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंद केली आहे. या नोंदीमुळे सिडकोला आता घरांच्या किंमती वाढवता येणार नसल्याने रेरा कायद्याचा मोठा दिलासा सिडकोत घर घेणार्या ग्राहकांना मिळाला आहे.
स्थावर संपदा क्षेत्रातील ग्राहकांचे हित जोपासले जावे म्हणून केंद्र सरकारने रेरा कायद्याची अमंलबजावणी देशात सुरु केली आहे. त्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण या कायद्यास मंजूरी दिली आहे. सर्व विकासकांना रेरा अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच घरे विकणे आणि त्याचे दस्ताऐवज सह निंबधकाकडे नोंदणी करता येणार आहेत. यापुर्वी सिडकोला सूट दिल्याने रेरा नोंदणी बंधनकारक नव्हती. परंतु, नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यात नवीन प्रकल्पातील घरे खरेदी व विक्रीसाठी रेरा नोंदणी बंधनकारक केली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा मोठा फायदा सिडकोत घरे खरेदी करणार्या ग्राहकांना होणार आहे. यापुर्वी सिडकोला या अटीतून सूट मिळाल्याने सिडको जाहीर केलेल्या किंमतीपेक्षा अधिक किंमत ग्राहकांकडून वसूल करत असे. 2018 मध्ये ज्या लाभार्थींना सदनिका मिळाल्या होत्या त्यांच्याकडून सिडकोने 2 ते 3 लाख अतिरिक्त वसूल केल्याची उदाहरणे आहेत. सिडकोच्या रेरा नोंदणीमुळे सिडकोला आता जाहिर किंमतीपेक्षा अतिरिक्त एक रुपयाही ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही. सिडकोने अतिरिक्त शुल्क आकारल्यास संबंधित ग्राहकांना रेराकडे दाद मागता येणार आहे. त्यामुळे सिडकोच्या रेरा नोंदणीचा मोठा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai