वाशी खाडीवर तिसरा पुल लवकरच

मुंबई : वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे बांधकाम, सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसर्‍या पुलाच्या बांधकामास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देऊन एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यामध्ये वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग, वाशी खाडीवर तिसरा पुल व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिका याविषयी चर्चा करण्यात आली. ठाणे खाडीवर वाशी येथे तिसर्‍या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.  या कामाला एक महिन्यात सुरुवात करावी असे निर्देश मुख्यंमत्र्यांनी दिले.