कोंढाणे, बाळगंगा धरणाला मिळणार गतीशक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 02, 2023
- 445
केंद्राकडून सिडकोला 254 कोटी 50 लाख मिळणार
नवी मुंबई : केंद्र सरकारने भांडवली गुंतवणुकीच्या प्रकल्पासाठी राज्यातील सिडको, एमएमआरडीए आणि पीएमआरडीएला 1304 कोटी कर्जास मान्यता दिली आहे. यातील पहिला हफ्त्याचे 652 कोटींचे बिनव्याजी कर्ज 50 वर्षांकरिता राज्य शासनाने वितरित केले आहे. यात सिडको बांधत असलेल्या कोंढाणे आणि बाळगंगा धरणासाठी 259 कोटी 50 लाखांचा समावेश आहे.
जलसंपदा विभागाकडून कर्जत तालुक्यातील कोंढाणे प्रकल्प ‘आहे त्या स्थितीत’ सिडकोकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. तसेच सिडकोच्या माध्यमातून पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहे. भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडको कोंढाणे आणि बाळगंगा ही धरणे बांधत आहे. यासाठी मोठी गुंतवणूक केलेली आहे.
केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीच्या विशेष सहाय्य योजनेच्या भाग-1 अंतर्गत सिडको, एमएमआरडीए आणि पीएमआरडीएला 1304 कोटींचे कर्ज मंजुर केले आहे. हे कर्ज एकूण भाग-7 अंतर्गत वितरीत करण्यात येणार आहे. या मंजुर रक्कमेच्या 50 टक्के रक्कमेचा पहिल्या टप्प्यातील 652 कोटींचे बिनव्याजी कर्ज 50 वर्षांकरिता वितरित केले आहे. यात सिडकोला कोंढाणे धरणासाठी मंजुर असलेल्या 250 कोटी रक्कमेपैकी 125 कोटी तर बाळगंगा प्रकल्पासाठी मंजुर असलेल्या 259 रक्कमेपैकी 129.50 कोटी रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. उर्वरित निधीत एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी 250 कोटी, कुर्ला-वाकोला आणि कुर्ला एमटीएनएल जंक्शनसाठी 87 कोटी 50 लाख आणि भारत फोर्ज ते वाकोला जंक्शन मार्गिकेसाठीच्या 22 कोटी 50 रुपयांचा समावेश आहे. तसेच ठाण्यातील ठाणे-कोपरी द्रुतगती मार्गासाठी 45 कोटी रुपये तसेच पीएमआरडीएच्या विद्यापीठ मेट्रो मार्गिकेसाठी 37 कोटी 50 लाख रुपये दिले आहेत.केंद्र शासनाने पंतप्रधान गतीशक्ती योजनेंतर्गत 50 वर्षांकरिता 100 टक्के भांडवली गुंतवणूक करण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यानुसार राज्य सरकारने सिडको, एमएमआरडीए आणि पीएमआरडीएचे प्रकल्प मंजुरीसाठी धाडले होते. एकूण 7 भागात विविध प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यातील भाग-1 मध्ये ठाणे-कोपरी पुलासाठी 45 कोटी तर भाग दोनसाठी 1304 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यातील 50 टक्क्यांचा पहिला हप्ता म्हणून 652 कोटी मंजूर केले आहेत. केंद्राने हा निधी वितरित केल्याने सिडकोस कोंढाणे आणि बाळगंगा ही धरणे आणि त्यांच्या पाइपलाइनची कामे लवकरात लवकर पूर्ण करून पनवेल-खारघर, कामोठे-उलवेसह नैना क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविणे सोपे जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai