एफआरआय मधून फोन नंबर गायब
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 13
राजकीय नेत्यांना वाचवण्याची धडपड असल्याची चर्चा
नवी मुंबई ः अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या न्यायालयाच्या बनावट स्थगिती आदेश प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. याप्रकरणी प्रथम दंडाधिकारी विनायक विश्वास यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयीन अधिक्षकांना दिले होते परंतु, सीबीडी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या एफआरआयमधून ज्या मोबाईलवरुन हे आदेश पाठवण्यात आले तो नंबरच गायब झाल्याने खळबळ माजली आहे.
सारसोळे गावातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये नोटीस बजावली होती. ही तोडक कारवाई लांबवण्यासाठी न्यायालयाचेच बनावट स्थगिती आदेश बनवून ते मोबाईल क्र. 7303413588 वरुन पालिका आयुक्तांना पाठवण्यात आले. या बनावट स्थगिती आदेशामुळे सदर इमारतीवरील कारवाई टाळण्यात आली. पालिका आयुक्तांनी सदर आदेशाबाबत पडताळणी करण्यास विधी विभागाला सांगितले असता तपासात सदर आदेश बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही बाब पालिकेच्या विधी विभागाने संबंधित न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायामुर्ती विनायक विश्वास यांनी सदर बाब गंभीर असल्याचे आपल्या आदेशात नमुद करत सहायक अधीक्षक यांना संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सहायक अधीक्षक प्रिया पाटील यांनी 20 जून 2026 रोजी सीबीडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार नोंदवताना त्यांनी ज्या मोबाईलवरुन ही माहिती पालिका आयुक्तांना कळवण्यात आली तो क्रमांक दिला नसल्याचे उघडकीस आले आहे. तसेच न्यायालयाची फसवणुक केली म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार केल्याचे एफआरआयमध्ये नमुद केले आहे. वास्तविक पाहता, तपासाची मुळ सुरुवात मोबाईल क्रमांकापासून होणार असल्याने आणि तोच नंबर या तक्रारीत नसल्याने या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होणार की नाही? याबाबत उलटसुलट चर्चा सध्या नवी मुंबईत आहे.
- नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी
शिवसेना नगरसेवक व जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन नगरसेवक व सभागृह नेते सागर नाईक यांच्यावर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम कलम 10(1)(1ड) अन्वये नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीत त्यांनी सागर नाईक यांनी न्यायालयाचे खोटे आदेशपत्र देऊन अतिक्रमण कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला आहे. पालिका आयुक्त याबाबत कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai