सिडकोची भूखंड विक्री बेकायदेशीर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2023
- 1235
चटईक्षेत्र यूडीसीपीआरप्रमाणे ठेवण्याचे सरकारचे आदेश
नवी मुंबई ः राज्यात विकासात एकसूत्रीपणा यावा म्हणून 2 डिसेंबर 2020 पासून नवीन बांधकाम नियमावली लागू केली आहे. या नियमावलीप्रमाणे राज्यातील संपुर्ण जमीनीचे बेसिक चटई निर्देशांक 1.1 निर्धारित केला असताना सिडकोने मात्र 1.5 चटई निर्देशांकाने शेकडो भुखंडाची विक्रि केली. शासनाने 2022 मध्ये सिडकोला यूडीसीपीआरप्रमाणे भूखंड भाडेपट्टयाने किंवा लिलावाने वाटण्याचे आदेश दिल्याने सिडकोची भूखंड विक्रि बेकायदेशीर ठरली आहे.
शासनाने राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात एकसूत्रीपणाने विकास व्हावा म्हणून 2 डिसेंबर 2020 पासून एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार विकासकांना बेसिक 1.1 चटई निर्देशांक अधिक अधिमूल्य चटईक्षेत्र निर्देशांक व अधिक टिडीआर देण्याची तरतूद अंतर्भुत केली आहे. या उपर विकासकांना 60 टक्के ॲन्सीलरी एफएसआय रेडीरेकनरच्या 35 टक्के दरात विकत घेता येणार आहे. ही नियमावली 3 डिसेंबर 2020 पासून राज्यातील सर्व महानगरपालिका व सिडकोला लागू केली आहे.
सिडकोने 3 डिसेंबर 2020 पासून शेकडो भूखंड नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका व सिडको कार्यक्षेत्रात लिलावाद्वारे वितरीत केले आहेत. या भूखंडांचा लिलाव करताना सिडकोने बेसिक चटईक्षेत्र 1.5 ठेवून विक्रि केली आहे. विकासकांनी लिलावात 1.5 बेसिक चटईक्षेत्र गृहित धरुन लिलावात बोली लावली आहे. परंतु, आता संबंधित नियोजन प्राधिकरणे विकासकांना 1.1 बेसिक चटईक्षेत्र गृहित धरुन बांधकाम परवानग्या देत असल्याने विकासकांचे गणित कोलमडले आहे.
याबाबत विकासकांनी शासनाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली असता शासनाने 12 ऑक्टोबर 2022 रोजी सुधारित स्पष्टीकरण आदेश क्र. 10 काढला आहे. या आदेशान्वये ज्या भूखंडांचे वाटप सिडकोने 2 डिसेंबर 2020 पुर्वी निविदेद्वारे केले आहे त्यांनाच 1.1 बेसिक चटईक्षेत्र व 0.5 अतिरिक्त चटईक्षेत्र अनुज्ञेय केला आहे. परंतु, ज्या भुखंडांचे वाटप एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली लागू झाल्यानंतर झाले आहे त्यांना या नियमानुसारच बेसिक चटईक्षेत्र देण्याचे स्पष्ट केले आहे. शासनाच्या या आदेशामुळे सिडकोने 1.5 बेसिक चटईक्षेत्र निर्देशंकाने लिलाव केलेली सर्व भूखंड विक्रि बेकायदेशीर ठरली आहे. याचा फटका नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना बसणार असल्याने मंत्रालय पातळीवर अर्थपुर्ण तडजोडीने नवीन स्पष्टीकरण आदेश काढण्याचा घाट घातला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai