आप मेळाव्यात जनताभिमुख विषयांवर मार्गदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2023
- 583
नवी मुंबई : आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभागीय आप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आप राष्ट्रीय कार्यकारणी, तसेच महाराष्ट्र कार्यकारणीचे सदस्यांनी सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या विविध जनताभिमुख विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आप महाराष्ट्र,कोकण विभागातर्फे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी क्षेत्रातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कार्यकत्यांचा मेळावा संपन्न झाला. ह्या मेळाव्यात दिल्लीच्या आपच्या आमदार आतीशी सिंह, आमदार कुलदीप कुमार राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती मेनन व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. आप नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह होता. यावेळी मान्यवरांनी सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या विविध जनताभिमुख विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ह्या मध्ये, सरकारी शिक्षण आणि स्वास्थ व्यवस्था, माहिती अधिकार, सरकारी निमसरकारी उद्योगाच्या खाजगीकरणाचा चालू झालेला अतिरेक, नागरी सुरक्षा, कामगार आणी शेतकरी समस्या असे विविध विषयांवर ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ह्यांच्या शिक्षण प्रणाली सल्लागार म्हणून काम करून दिल्ली मधील मोफत सरकारी शिक्षण व्यवस्थेमध्ये क्रांतिकारक बदल घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आमदार अतीशी सिग, ह्यांनी उत्कृष्ट सरकारी शिक्षण व्यवस्था कशी असावी ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
पीक विमा योजना राबवितात तर दुसरीकडे डीएपी खताच्या पोत्याच्या किमती भरमसाठ वाढवतात. त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांसाठीची पीक विमा योजना म्हणजे पंतप्रधानांची मान्यताप्राप्त मटका योजना आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष रंग राचुरे यांनी केला. या मेळाव्याला आप महाराष्ट्र कार्यकारिणीचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला, महादेव नाईक महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन, धनराज वंजारी, हरिभाऊ राठोड, धनंजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai