परीक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 26, 2023
- 593
नवी मुंबई ः पंतप्रधानांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातंर्गत 25 जानेवारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदान तसेच कोपरखैरणे येथील निसर्ग उदयान येथे करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी सूमारे 2796 विद्यार्थी सहभागी झाले होते.
राज्याचे शिक्षणमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये परीक्षा पे चर्चा ही राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा विधानसभानिहाय आयोजित करणे ाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई क्षेत्रातील परिमंडळ 2 साठी निसर्ग उदयान कोपरखैरणे येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी अंदाजे 1607 इतक्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते. तसेच परिमंडळ 1 साठी यशवंतराव चव्हाण मैदान नेरुळ येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी अंदाजे 1189 इतक्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते. स्पर्धेसाठी विषय केंद्र स्तरावरुन निर्गमित करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम हा पुर्णपणे अराजकीय पध्दतीने करावयाचा असुन त्यामध्ये राजकीय नेत्यांचे फोटो टाळणेबाबत स्पष्ट निर्देश देण्यांत आले होते. सदर स्पर्धेबाबतचे फोटो, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, स्पर्धेतील विदयार्थ्यांच्या उत्तम चित्रांचे फोटो व स्पर्धेबाबतचा जिल्हयाचा अहवाल केंद्राकडुन मिळालेल्या लिंक वर अपलोड करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai