नैना भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 03, 2023
- 562
नवी मुंबई : ‘नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती गेले अनेक वर्ष याविरोधात लढत आहे. शेतकऱ्यांच्या समंतीविना सिडकोने विकास आरखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनी कशा दाखवल्या याचा जाब गुरुवारी सिडको कार्यालयात झालेल्या सुनावणीवेळी विचारला. आम्ही नैना प्रकल्पात सहभागी होणार नाही अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने नैना प्रकल्प रखण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना प्रकल्प उभारण्याचे नियोजन सिडकोतर्फे येत आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या दोन विकास आराखड्यांना शासनाने मंजूरी दिली आहे. परंतु, नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांचा या प्रस्तावास सुरुवातीपासूनच विरोध आहे. गेल्या दहा वर्षात नैनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करुन अडचणीत आणण्याचे काम केले असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नैना विरोधी पहिला मोर्चा 2013 मध्ये काढण्यात आला होता. तसेच सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात पाच हजार शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या. मात्र, त्याची कोणतीही दखल न घेता हा प्रकल्प रेटण्यात आला. सुरुवातीला भूसंपादनाचे 60:40 असे प्रमाण सांगण्यात आले. नंतर हे प्रमाण 40:60 असे करण्यात आले. एकूणच सिडकोच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांची फसवणुक केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नैना साठी जमिन संपादीत करताना शेतकऱ्यांना 40 टक्के आणि सिडकोला 60 टक्के हे प्रमाण गोंधळात टाकणारे आहे. हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत सहकार्य करणार नाही.
गुरुवारी सिडकोच्या कार्यालयात शिवकर, डेरवली, पळस्पे, कोन, चिखले, कोळखेपेठ येथील शेतकऱ्यांची सुनावणी होती. या सुनावणीत शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सिडको हा प्रकल्प लादत असल्याने नैनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. या आंदोलनात सरपंच अनिल ढवळे, पर्यावरण तज्ञ रानडे उपस्थित होते. नैना प्रकल्पात सहभागी होणार नसल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सुनावणीदरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai