पॉवरलिफ्टर तरुणीची आत्महत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 01, 2018
- 514
उरण ः पॉवरलिफ्टिंगमध्ये नावलौकिक करणार्या वैभवी पाटेकर (19) हिने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यात घडली. एफवायबीएच्या परीक्षेत काही विषयांत नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून वैभवीने आत्महत्या केल्याचे समजते.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे राहणार्या ज्योतिका पाटेकर यांनी पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या चार मुलींपैकी धाकटी वैभवी हिने दोन वर्षांपूर्वी पॉवरलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने वयाच्या 48व्या वर्षी ज्योतिका यांनी पुन्हा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. आईपासून प्रेरित झालेल्या वैभवीने पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेत सुवर्णपदक मिळविले होते. पाटेकर कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने वैभवी तिच्या आईला मदत करीत छोटा सॅन्डविच स्टॉल चालवीत होती. एफवायबीएच्या परीक्षेत काही विषयांत नापास झाल्याने वैभवी निराश झाली होती. याच नैराश्यातून तिने 28 ऑगस्टच्या रात्री घराजवळच असलेल्या तलावात उडी मारून आत्महत्या केली. होतकरू क्रीडापटू असलेल्या वैभवीने क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai