आपत्कालीन मदतीसाठी 112 हेल्पलाईन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 449
कमी वेळेत प्रतिसाद देण्यास नवी मुंबई पोलिस राज्यात चौथ्या क्रमांकावर
नवी मुंबई ः आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने राज्यात डायल-112 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जातो. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी सरासरी 5 मिनिटे 28 सेकंद इतका कमी वेळ नोंदवला असून राज्यातील पोलिस दलांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे.
राज्यातील नागरिकांना पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी 112 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील 45 पोलिस आयुक्तालयांत आणि जिल्हा पोलिस कार्यालयांमध्ये यासाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत. डायल 112 या आपत्कालीन वेळेत मदतीसाठी एकच क्रमांक सुरू होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मात्र सध्या केवळ पोलीस सेवेसाठी याचा उपयोग होणार आहे. त्याच्या प्रसिद्दीसाठी नवी मुंबई पोलिसांनी “अलर्ट नवी मुंबईकर” हा उपक्रम हाती घेतला आहे. याचे उद्धटन पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांच्या हस्ते वाशीत करण्यात आले. महासंचालक कुलवंतसिह यांनी माहिती देताना सांगितले की 112 क्रमांक सुरू झाला असला तरी 100 क्रमांक बंद झालेला नाही. भारत एवढा मोठा देश असूनही आपत्कालीन वेळेत एक युनिक क्रमांक नाही यासाठी अमेरिकेच्या धर्तीवर हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात प्रतिसाद वेळ जास्त आहे त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात अँनालीसेस करण्याची ही सुविधा असल्याने प्रत्येक प्रकारच्या समस्येवर उपाययोजना करता येणे शक्य होत आहे असे कुलवंत सरंगल यांनी सांगितले.
नवी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात जानेवारी महिन्यामध्ये 5095 कॉलची नोंद झाली आहे. त्यातील सर्व कॉलला कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन कॉलरला आवश्यक असलेली मदत मिळवून पोलिसांना यश आले आहे. तसेच या हेल्पलाईनवरील प्रतिसाद वेळ सरासरी 5 मिनिटे 28 सेकंद इतका नोंदला गेला असल्याने कमीत-कमी वेळेत प्रतिसाद देणाऱ्या राज्यातील पोलिस दलात नवी मुंबई पोलिस चौथ्या क्रमांकावर आहेत. ही सेवा सुरू होऊन 1 वर्ष झाले आहे. याचे अधिकृत उद्घाटन एप्रिलमध्ये झाले आहे. येथे फोन केल्यावर आतापर्यंत सर्वात कमी वेळेत घटनास्थळी पोहचण्याचा वेळात नवी मुंबई राज्यात दुसऱ्या क्रमांक आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai