12894 बालकांची आरोग्य तपासणी
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 476
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बालकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान अंतर्गत बालकांच्या आरोग्य तपासणीला 9 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून 12894 बालकांची तपासणी करण्यात आलेली आहे.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले असून पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दैनंदिन तपासणी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष तपासणी कार्यवाहीला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून तपासणी केलेल्या 12894 बालकांपैकी 506 बालकांवर सुयोग्य औषधोपचार करण्यात आलेला आहे.
हे अभियान पुढील आठ आठवडे म्हणजेच 45 ते 48 दिवस हे अभियान राबविले जाणार असून यामध्ये तपासणीअंती आवश्यकता भासल्यास त्या मुलांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. याअभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापक प्रसिध्दी मोहीम राबविण्यात आली असून बॅनर व होर्डींग प्रमाणेच विभागाविभागात ठिकठिकाणी माइकिंग करण्यात येत आहे. तरी 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या पालकांनी जागरुक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत आपल्या पाल्याची आवर्जुन आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरुन योग्य उपचार करणे शक्य होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai