कंत्राटी भरती विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2023
- 342
नवी मुंबई : महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या कंत्राटी पद भरती निर्णयाच्या विरोधात संभाजी ब्रिगेड संघटनेने वाशी येथे आंदोलन केले असून जो पर्यंत हे परिपत्रक मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत संघर्ष करणार असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने 14 मार्चला कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा चुकीचा निर्णय तत्काळ रद्द करावा. या मागणीसाठी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीची पोकळ घोषणाबाजी होत असताना दुसरीकडे सरकार कंत्राटी पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारने काढलेले परिपत्रक म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्या संपवण्याची नांदीच आहे असा आरोप करुन शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पदभरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी आपण व आपले शासन जबाबदार राहील असा इशारा संभाजी ब्रिगेड, नवी मुंबई सचिव महेश मानकर यांनी यावेळी दिला. या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कदम, तालुका अध्यक्ष सचिन वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai