Breaking News
पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पालिकेचा निर्णय
नवी मुंबई ः धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालवल्याने नवी मुंबई वगळता राज्यातील अनेक महापालिकांनी गेल्या महिन्यापासून पाणीकपातीस सुरुवात केली आहे. आता पाऊस लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी नवी मुंबई पालिकेनेही शहरात विभागानुसार आठवड्यातील एक संध्याकाळ पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. 28 एप्रिलपासून हे पाण्याचे नियोजन शहरात लागू होणार आहे.
स्वतःचे धरण असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करुन शहराला वर्षभर 24 तास पाणीपुरवठा करणारी जलसंपन्न महापालिका असा नवी मुंबई शहराचा नावलौकीक राज्यात आहे. मात्र गेल्यावर्षी धरण पूर्ण भरले नसल्याने यावेळी अवघा 39.36 टक्केच टक्के पाणीसाठा शिल्लक असून 9 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच पाण्यासाठी मोरबे धरणात उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याचा साठा कमी असल्याने त्यात पाऊसही लांबणार असल्याची शक्यता असल्याने भविष्यात शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावू नये म्हणून पालिकेने एक संध्याकाळ पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार लांबणीवर पडणारा पाऊस व पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पालिकेने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्याचे सूचित केल्याप्रमाणे पालिकेने नियोजन केले आहे. त्यानुसार विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. 28 एप्रिलपासून ही पाणी कपात व पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यंदा धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने यावेळी अवघा 39.36 टक्केच टक्के पाणीसाठा शिल्लक असून 9 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच पाण्यासाठी मोरबे धरणात उपलब्ध आहे . त्यामुळे नवी मुंबई शहरात पाणी कपात होणार असून शुक्रवारपासूनच पाणीकपात केली जाणार आहे.
या दिवशी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी शहरात प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे व पालिकेला सहकार्य करावे. - राजेश नार्वेकर, आयुक्त, नमुंमपा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस