ई सिगारेटचा साठा जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- May 05, 2023
- 246
नवी मुंबई : नवी मुंबईत गुन्हे शाखेने खारघर येथील सेक्टर 4 मध्ये छापा टाकला असता तिथे 6 लाख 44 हजार 100 रुपये किमतीच्या विविध फ्लेव्हरच्या ई- सिगारेट आढळल्या. या प्रकरणी अर्जुन राठोड (वय 27) नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री महावीर एक्स्प्रेस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मण व्हिला इमारतीच्या गाळ्यामध्ये ई-सिगारेटचा साठा ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार संतोष गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, 3 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सदर गाळ्यामध्ये छापा टाकला. गाळ्याची पाहणी केली असता तिथे 6 लाख 44 हजार 100 रुपये किमतीच्या विविध फ्लेव्हरच्या ई- सिगारेट आढळल्या. यानंतर पोलिसांकडून हा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अर्जुन राठोड विरोधात द प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ॲक्ट 2019 चे कलम 4 (1) 7 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात असे प्रकारे उघडकीस येत असल्याने याबाबत या पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवली असून अधिक तपास सुरू केला आहे. तर अशा गुन्ह्यांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकली असल्याचेही समोर आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai