58434 मुलांना पल्स पोलिओ लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2023
- 351
नवी मुंबई ः महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. पालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा विविध ठिकाणी 604 स्थायी, 94 ट्रांझिट व 28 फिरते मोबाईल असे एकूण 726 पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. यामध्ये 58434 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. म्हणजेच 64% अपेक्षित लाभार्थी मुलांचे लसीकरण झालेले आहे.
5,59,945 घरांपर्यंत नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहीमेची माहिती पोहचविण्यात आली. तसेच आशा व एएनएम मार्फत कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली. या शिवाय महानगरपालिका क्षेत्रात 730 बॅनर्स आणि 2936 पोस्टर्समधून व्यापक प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात आली. साधारणत: 90897 इतके 5 वर्षाखालील लाभार्थी नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. लसीकरण बूथवरील 2 हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन पोलिओ लस पाजण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai