दिघा रेल्वे स्थानक सुरू करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2023
- 337
खासदार राजन विचारे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई ः ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात ऐरोली-कळवा रेल्वे प्रकल्पातील तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक सुरू करा अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन 10 डिसेंबर 2016 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभर याचे काम सुरू होत नव्हते परंतु हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच रेल्वे, एम आर व्हीसी विभागाकडे पाठपुरावा करून सदर प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये करून यातील अडथळे दूर करून दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून घेतले. आजतागायत गेले 4 महिने उलटूनही दिघा रेल्वे स्थानक लोकार्पण सोहळा संपन्न होत नसल्याने दिघावासियांची नाराजी रेल्वे मंत्रांकडे मांडली आहे.
दिघा गाव परिसरात नागरी लोक वस्ती मोठ्या प्रमाणात असून याच परिसरात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व कामगार वर्गाला ऐरोली येथे उतरून दिघा येथे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी लवकर दिघा रेल्वे स्थानक सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कळवा एलिव्हेटेड रेल्वे स्थानक व मार्गिका याचे काम सुरू करण्यासाठी 1080 झोपड्यांचे पुनर्वसनाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने याला गती देऊन याचेही काम लवकर सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात मध्यरेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे प्रबंधक व एम आर व्ही सी चेअरमन यांनाही पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai