Breaking News
खारघर दुर्घटनेप्रकरणी एक सदस्यीय समितीला मुदतवाढ
नवी मुंबई ः खारघर दुर्घटनेला दीड महिना उलटून गेला तरी चौकशी समितीने अहवाल सादर केला नाही. आता अहवाल सादर करण्यासाठी समितीने एक महिन्याची मुदत मागितली आहे.
16 एप्रिल रोजी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने 20 एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली होती आणि त्यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या एकल सदस्यीय समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर यांच्या नेतृत्वाखालील समितीने आता अहवालासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. खारघर दुर्घटनेनंतर, राज्य सरकारने 21 एप्रिल रोजी या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि महिनाभरात अहवाल सादर करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी महिनाभराची मुदत मागितली आहे.
खारघर प्रकरणावर दाखल जनहित याचिकेवर 8 जूनला सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुतेंमार्फत याचिका दाखल केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai