Breaking News
महिलांची संख्या निम्म्याहून अधिक; पोलीसांसमोर मोठे आव्हान; नवी मुंबईत दरमहिन्याला 50 हून अधिक महिला बेपत्ता
नवी मुंबई ः गेल्या पाच महिन्यात तब्बल 674 व्यक्ती नवी मुंबई, पनवेल शहरातून बेपत्ता झाल्या आहेत. 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या कालावधीत बेपत्ता झालेल्यांमध्ये 376 महिलांचा समावेश असून 298 पुरुषांचा समावेश आहे. राज्यातील महिला, मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची बाब पुढे आली असतानाच नवी मुंबई सारख्या शहरातही मोठ्या संख्येत महिला बेपत्ता झाल्याचे दिसून येते.
शहरात सायबर गुन्हेगारी वाढत असतानाच दुसरीकडे शहरातून व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नुकताच राज्यातील मुलींच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर नवी मुंबई, पनवेल शहरात देखील मुलींचे बेपत्ता होणे चिंतेची बाब समोर आली आहे. राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 390 ने वाढ झाली आहे. राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असून, बेपत्ता होणाऱ्या मुली 18 ते 25 वयोगटातील आहेत. नवी मुंबई शहरात 1 जानेवारी ते 31 मे 2023 या कालावधीत तब्बल 674 व्यक्ती बेपत्ता असून मे महिन्यात याचे प्रमाण अधिक आहे. 674 पैकी 376 महिलांचा समावेश आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. रागाच्या भरात घरातून निघून जाणे, आई-वडिलांवर रूसून निघून जाणे, बदनामीच्या अगर मार खाण्याच्या भीतीने घर सोडणे, नोकरी, विवाहबाह्य संबंध, लग्न, कलह, प्रेमप्रकरण अशी कारणे या व्यक्ती बेपत्ता होण्यामागे आहेत.
महिना महिला पुरुष
एकूण 376 298
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस