डॉक्टर्स, रुग्णालयांना नोंदणी अनिवार्य
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 05, 2018
- 523
पनवेल : पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स, रुग्णालये आदींनी पालिकेच्या आरोग्य विभागात आपली नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरिता पालिकेने 31 डिसेंबर 2018पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत नोंदणी न केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
महापालिका क्षेत्रात कोणताही वैद्यकीय व्यवसाय करण्यापूर्वी संबंधित विभागात रीतसर नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स, रुग्णालये आदींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार आता पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकार्यांनी आरोग्य विभागात नोंदणी करणे गरजेचे आहे. पालिकेने यासंदर्भात जाहीर नोटीस देखील काढली आहे. 31 डिसेंबर 2018 पूर्वी पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स व दवाखाने आदींनी पालिकेत नोंदणी करावी. या नोंदणीमध्ये संबंधित दवाखाना, क्लिनिक आदीमधील सुविधा, कर्मचारी वृंद, सेवा सुविधा कोणत्या प्रकारच्या पुरविल्या जाणार आहेत यासंदर्भात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीत संबंधितांनी नोंदणी न केल्यास पालिका संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या या निर्णयाने पालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा विषय देखील चव्हाट्यावर येणार आहे. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करून दवाखाने व क्लिनिक चालवणारे आपोआपच कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत.
पनवेल महानगर पालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयाची संख्या मोठी आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरात 30 पेक्षा जास्त लहान-मोठे दवाखाने आहेत. त्या पाठोपाठ खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर आदी ठिकाणचा समावेश आहे. पालिका क्षेत्रात सुमारे 300 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये व क्लिनिकचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai