कर्नाळा बँक ठेवीदारांचा जूनअखेरीस रास्ता रोको
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 09, 2026
- 24
पनवेल : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना राज्य आणि केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. इतर आरोपी अटक करत नाहीत. ठेवीदारांचे पैसे देण्यास सरकार तयार नाही. सरकारला जागे करण्यासाठी जून महिन्याच्या अखेरीस कळंबोली सर्कलजवळ पुन्हा रास्ता रोको करण्याचा निर्धार या बैठकीतून घेण्यात आला.
माजी आमदार व कर्नाळा बँकचे अध्यक्ष विवेकानंद पाटील यांना ईडीने अटक केल्याच्या घटनेला येत्या 14 तारखेला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. पनवेल संघर्ष समितीच्या दणक्याने व भारतीय रिझर्व्ह बँकेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पाच लाख रकमेपर्यंतच्या ठेवीदारांना विमापोटी रक्कम मिळाली. अद्यापही अडीच हजार ठेवीदार वंचित असून त्यांना 167 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. याबाबतीत राज्य व केंद्र सरकारला पूर्णतः अपयश आले आहे. बँक घोटाळ्यातील 82 आरोपींपैकी पाच जणांना अटक झाली. त्यापैकी तिघे जण जामीनावर मुक्त झाले आहेत. दोघे जण कारागृहात आहेत. त्यातील मुख आरोपी विवेकानंद पाटील यांना 14 जुनला कारागृहातील पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. पाटील यांचे चिरंजीव अभिजित पाटील याला गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या सीआयडी विभागाला अटक करता आली नाही. यामध्ये खूप मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी व्यक्त केला.
तसेच येत्या 15 दिवसांच्या आत पुढील बैठकीत ठोस निर्णय घेऊन आरपारची लढाई लढण्याचा निर्धार ठेवीदारांनी व्यक्त केला. येत्या आठवडाभरात आंदोलनाची दिशा ठरवण्याची पुढील बैठक गणेश बडगुजर, मनोहर उरणकर, अमित ठाकूर, प्रदीप मोकळ, हेमंत घाडी, राजेश कोळी, अरविंद फडणवीस, के. पी. चटर्जी, नारायण राऊत घेणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai