Breaking News
नवी मुंबई : बाराही महिने घणसोली रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात पाण्याची गळती सुरुच असते. त्यात पहिल्याच पावसात या मार्गात पाणी साचल्याने प्रवाशांना त्यातून वाट काढणे जिकरीचे झाले होते. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसाने संपुर्ण भुयारी मार्ग जलमय झाला होता. त्यामुळे सोमवारी पहाटे पासून याठिकाणी प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागली.
घणसोलीत रहिवाशी भाग आणि औद्योगिक वसाहत दोन्ही असल्याने विकसीत झाल्याने रेल्वे स्थानकांत मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या स्थानकात फलाट क्र. 3 च्या भुयारी मार्गाजवळील पायऱ्यांवर सतत पाण्याची गळती होत असल्याने अनेक प्रवाशी घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याविषयी वारंवार पाठपुरावा व तक्रार केल्या तरीही प्रशासनाला ही गळती थांबवण्यात यश आले नाही. त्यात आता पावसाळा सुरु झाल्याने पहिल्याच पावसात हा संपुर्ण भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याचे चित्र सोमवारी सकाळी येथे पाहायला मिळाले. रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी स्थानकातील सबवेमध्ये साठल्याने प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागली. नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांचा सबवे भूमिगत असल्याने तेथे पाणी साचते. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविले जातात. मात्र घणसोली रेल्वे स्थानकात पंपाची व्यवस्था नसल्याने हा मार्ग जलमय झाला होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशी वर्गाने केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस