वीर वुमन फाउंडेशन चे मॅमोग्राफी कॅम्प

पनवेल : वीर वुमन फाउंडेशनच्या वतीने मॅमोग्राफी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होत. हा कॅम्प पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ येथे झाला असुन, या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर आणि अर्चना ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेली एक्स रे तपासणी. मॅमोग्राफीची आवश्यकता- भारतामध्ये गेल्या काही वर्षांत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दर हजारी लोकसंख्येमध्ये 0 ते 1 वरून 2.5 केसिस इतके वाढले आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे असते. लवकर निदान झाल्यास उपचार सुलभ व कमी त्रासाचे असतात. हे लवकर निदान मॅमोग्राफी ने केले जाते. वीर वुमन फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्या अनुषंगाने स्तन कर्करोग हा आजार अनेक महिलांना होत आहे. हा आजार भयावह असुन, असंख्य महिला या आजाराच्या शिकार होऊन त्यांचा मृत्यु होतो. या आजारापासुन सावध राहण्यासाठी वीर वुमन फाउंडेशनने ममोग्राफी कॅम्पचं आयोजन केलं होत. त्यामधून या आजाराची जनजागृती करण्यात आली. या वेळी नगरसेविका मुग्धा लोंढे, वीर वुमन फाउंडेशनच्या सदस्या यांच्यसह मान्यवर उपस्थित होते.