क्रांती एक्स्प्रेसमधून दारुची तस्करी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 13, 2023
- 387
पनवेल : केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या डब्यातून तीन बेवारस बॅगांमध्ये लपवलेला दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता. 11) सकाळी पनवेल रेल्वे स्थानकात ही कारवाई केली आहे.
केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून दारूचा साठा बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती पनवेल आरपीएफच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पनवेल रेल्वे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या एक विशेष पथकाने सकाळी 11 च्या सुमारास केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकावर आल्यानंतर डब्यांची तपासणी केली असता कोच बी-1 मधील बर्थ क्रमांक 71 खाली तीन बॅगा संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. याबाबत प्रवाशांकडे विचारणा केली असता काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी कोणीही संशयित प्रवासी नसल्याने आरपीएफच्या पथकाने जप्त केलेल्या बॅगमधून 21,720 रुपये किमतीचा दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai