हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसनासाठी आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2023
- 572
उरण ः जुना शेवा कोळीवाडा येथील जमीन जेएनपीटी (जेएनपीए) बंदरासाठी संपादित झाली. येथील ग्रामस्थांचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र हनुमान कोळीवाडा गावात सर्व घरांना वाळवी लागल्याने नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय शासनाच्या मापदंडा नुसार हे पुनर्वसन झाले नव्हते त्यामुळे गेली 38 वर्षे जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. याच्या निषेधार्थ एकता महिला बचतगट हनुमान कोळीवाडा व इतर सर्व महिला बचत गटातर्फे 17 जुलैपासून उरण तहसिल कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
शासनाने 12 फेब्रुवारी 1970 च्या अधिसुचने नुसार सन 1983 साली एनएसपीटी प्रकल्पाला 12 गावाच्या हद्दीतील 2933 हेक्टर जमिन (गावठाण वगळून) संपादून दिली होती. जेएनपीटी ने विनाकारने गरज नसताना शेवा कोळीवाडा गावाची जमीन घेऊन जेएनपीटीने प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे 38 वर्ष उलटून हि शासनाचे माप दंडाने मंजूर असलेले पुनर्वसन केलेले नाही. तहसीलदार यांच्या हातात सर्व अधिकार असताना ते जाणीवपूर्वक पुनर्वसन करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप मच्छिमार नेते रमेश कोळी यांनी केला. लोकआयुक्त यांच्या शिफारशीनुसार जेएनपीटी प्रशासनाकडे पडीक असलेली सर्व जमीन तहसीलदार यांनी ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या दि.16/05/2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार काम करावे अशी मागणी रमेश कोळी यांनी यावेळी केली.
पुनर्वसन न करता शासनाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकाऱ्यांनीच मानवी हक्कांचा भंग केलेला आहे. तरी शासनाने लक्ष घालून जिल्हाधिकारी रायगडचे आदेशानुसार एन एस पी टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे 38 वर्षांनी पुनर्वसनाचे तहसीलदारांनी हे जेएनपीटीच्या दबावाखाली हेतुपुरस्सर काम करत नसल्याचे संशयाच्या निषेधार्थ 17 जुलै 2023 पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आपल्या विविध मागण्यासाठी जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामस्थांनी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ते तहसील कार्यालय येथ पर्यंत पायी यात्रा काढली. तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरु केले. शासनाला तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सद्बुद्धी लाभो. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होवोत यासाठी ग्रामस्थांतर्फे हनुमान चालीसाचे पठणही यावेळी करण्यात आले. पुरुषांसह महिलांचाही सहभाग यावेळी मोठ्या प्रमाणात होता. धो धो पाऊस सुरु असतानाही पुनर्वसनच्या मागणीसाठी ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहून धरणे आंदोलन करत भर पावसात उभे होते. आता या भूमिकेवर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत येतो. जोपर्यंत केंद्र सरकारची परवानगी मिळत नाही तोपर्यंत या ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लागू शकत नाही. हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकर निकाली लागावा यासाठी मी जेएनपीटी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. सदर धरणे आंदोलन चालू असताना मी ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुनर्वसनाचा प्रश्न लवकर मार्गी लागावे यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. -उद्धव कदम, तहसीलदार, उरण
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai