डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दर सोमवारी बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2023
- 495
नवी मुंबई ः पालिकेने सेक्टर 15 ऐरोली येथे ऐरोली-मुलुंड खाडीपूलानजिक उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक हे ज्ञानस्मारक म्हणून नावाजले जात आहे. लक्षावधी नागरिकांनी याठिकाणी भेट देत येथील सुविधांचे कौतुक केले आहे. स्मारकाची देखभाल-दुरूस्ती व्यवस्थित रितीने होण्याकरिता यापुढील काळात आठवड्यातील 1 दिवस म्हणजेच सोमवारी स्मारक बंद असणार आहे.
देशापरदेशातील बाबासाहेबांच्या विविध स्मारकांमध्ये या स्मारकाचे वेगळेपण स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येक मान्यवर व्यक्तीने आवर्जून सांगितले असून लक्षावधी नागरिकांनी याठिकाणी भेट देत येथील सुविधांचे कौतुक केले आहे. 5 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा तत्कालीन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकातील सुविधांचे लोकार्पण होऊन स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून मागील 1 वर्ष 7 महिने 10 दिवसांच्या कालावधीत म्हणजेच 589 दिवसात या स्मारकाला 1 लक्ष 77 हजार 373 नागरिकांनी नोंद करून भेट दिलेली आहे. विशेषत्वाने शनिवार व रविवारी नागरिकांचा स्मारक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओघ असतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांकरिता खुले असते. स्मारकाची देखभाल-दुरूस्ती व्यवस्थित रितीने होण्याकरिता यापुढील काळात आठवड्यातील 1 दिवस म्हणजेच सोमवारी स्मारक बंद असणार आहे. स्मारकातील प्रवेशासाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेशशुल्क आकारले जाणार नसून स्मारकात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी मनाई आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai