अर्बन हाटचे टाळे उघडा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 05, 2023
- 225
आ. मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई : राज्य शासनाच्या लघू उद्योग विकास विभागाकडे बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील 12 एकरच्या टेकडीवर सिडकोमार्फत कलाग्राम (अर्बन हाट) उभारण्यात आले आहे. कोरोना कालावधीपासून या वास्तूला सिडकोने टाळे लावले आहे. कलाकारांसाठी हे लावलेले टाळे लवकरच उघडण्याची मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे.
कोरोना काळानंतर सिडकोने बंद ठेवलेले अर्बन हाट पुन्हा कार्यान्वित न करता अर्बन हाटला टाळे ठोकले होते. त्यामुळे महिला बचत गट, असंख्य हातमाग आणि हस्तकला कलाकारांची हक्काची बाजारपेठ हिराऊन घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हर्बन हाट सुरु करण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात विशेष मागणी केली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना आणि असंख्य हस्तकला, हातमाग कलाकारांना हक्काची बाजारपेठ पुन्हा उपलब्ध असून राज्यासह विविध राज्यातील उत्पादकांना सुगीचे दिवस येतील. दरम्यान, आ. मंदा म्हात्रे यांनी यापूर्वी अर्बन हाट योग्य ती डागडुजी करुन लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना पत्र दिले आहे.
या अर्बन हाटमध्ये गणेश उत्सव, श्रावण मेळा, दसरा मेळा, दीप मेळा अशा अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत होते. तसेच हरियाणा, केरळ, राजस्थान, आदि विविध राज्यातून कलाकारांनी स्वतः तयार केलेली उत्पादने येथे विकण्यास येत होती. कोरोना काळात सिडकोने अर्बन हाटला टाळे लावल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सदर बाब लक्षात येताच अर्बन हाटची संपूर्णता डागडुगी पूर्ण करुन ते लवकरात लवकर पावसाळ्यात नंतर सुरु करुन द्यावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai