विमानतळ प्रवेशद्वारावर झळकले दिबांच्या नावाचे फलक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 10, 2023
- 351
सर्वपक्षीय कृती समितीची नामकरणासाठी निदर्शने
उरण : राज्य सरकारने विमानतळाच्या नावाचा ठराव मंजूर केला आहे. मात्र केंद्र सरकार कडून दिरंगाई होत असल्याने भूमीपुत्रांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने हा ठराव लवकरात लवकर मंजूर करावा यासाठी 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तरघर, उलवे व चिंचपाडा येथील प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामफलक लावण्यात आले. तसेच नावाचा ठराव लवकरात लवकर मंजूर करावा, अन्यथा भूमीपुत्रांचा आझाद मैदान ते मंत्रालय लाँग मार्च काढू असा इशाराही देण्यात आला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरणावरुन आजपर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत. विमानतळ लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भुमीपुत्रांनी अनेकवेळा आंदोलने केली, मोर्चा काढला. बाळासाहेब ठाकरे की दि.बा.पाटील यावरुन संघर्ष सुरु होता. दिबांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्यने एकवटले होते. अखेर राज्य सरकारने लोकनेते दि.बा. पाटील नावाचा ठराव मंजूर केला. त्याच्या मंजुरीला केंद्र सरकार कडून दिरंगाई होत असल्याने भूमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तरघर, उलवे व चिंचपाडा येथील प्रवेशद्वारावर समितीच्या वतीने नाम फलक लावण्यात आले.
आम्हाला संघर्ष करायला लावू नका असे आवाहन समितीचे अध्यक्ष दशरत पाटील यांनी सरकारला केले. त्यांनी यावेळी सरकारने गांधी जयंती पूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा 11 ऑक्टोबरला जयप्रकाश जयंतीदिनी मुंबईत भूमिपुत्रांचा आझाद मैदान ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाच्या ठरावाची अंमलबजावणी करा. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिलंच पाहिजे, प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमात माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, कॉ. भूषण पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते आणि महिलाही उपस्थित होत्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai