ऐरोली क्षेत्रात भाजपची तिरंगा रॅली
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 16, 2023
- 301
नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रात नवी मुंबई भाजपच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. दिघा येथून निघालेल्या या रॅलीचा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.
दिघा येथील तलावाजवळून आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी दिघा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना आमदार नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या बाईक रॅलीमध्ये युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वच घटक भारत माता की जय अशा घोषणा देत होते. देशभक्तीपर गीतांनी माहोल भारलेला होता. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. दिघा येथून सुरू झालेली ही बाईक रॅली ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध भागातून मार्गस्थ होताना ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली. आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल अभिमान आहेच. हा अभिमान वृद्धिंगत होऊन कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे आवाहन आमदार नाईक यांनी यावेळी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai