215 स्वच्छताकर्मींनी कुटुंबियांसमवेत केली दंतचिकित्सा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 21, 2023
- 360
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारचा एक दंतचिकित्सा शिबिराचा अभिनव उपक्रम भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऐरोली येथील स्टेमआरएक्स हॉस्पिटलमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगातून 15 व 16 ऑगस्ट असा दोन दिवस राबविण्यात आला. 215 स्वच्छताकर्मी व त्यांच्या कुटुंबियांनी या विनामूल्य शिबिराचा लाभ घेऊन आपली दंतचिकित्सा करून घेतली.
या दंतचिकित्सा शिबिराच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्टेमआरएक्स रुग्णालयाने पुढाकार घेत स्वच्छताकर्मींकरिता दंतचिकित्सा शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे सांगितले. या दंतचिकित्सा शिबिरामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहील असा विश्वासही डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केला. शिबिराचे आयोजक स्टेमआरएक्स रुग्णालयाचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी या शिबिराच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेचे रक्षण करणाऱ्या स्वच्छता रक्षकांची सेवा करण्याची संधी आम्हांला उपलब्ध करून दिली त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आभार मानले. यापुढील काळातही स्वच्छताकर्मींसाठी जे जे शक्य होईल ते ते करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धांत महाजन यांनी सामाजिक कार्यासाठी आम्ही यापुढील काळातही पुढाकार घेऊ असे सांगत शिबिराला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
या दोन दिवसीय शिबिरात 215 स्वच्छताकर्मीं आणि त्यांच्या कुटुंबियांनी दंतचिकित्सा करून घेतली. चिकित्सेनंतर त्यांच्या दातांची मोफत स्वच्छता करून देण्यात आली. यामधील 22 व्यक्तींना पुढील उपचाराची गरज असल्याचे निदान निघाले, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai