कोकणसाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गावर टोलमाफी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 21, 2023
- 525
मुंबई : कोकणातील गणेशोत्सवाची लगबग ही सर्वांच्या परिचयाची आहेच. त्याच पार्श्वभूमीवर गणोशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईत स्थायिक असलेल्या प्रत्येक कोकणवासीयांची लगबग सुरु असते. रेल्वे आणि एसटीचे सहा महिने आधी बुकिंग बरेच जण करतात. त्यामुळे एसटी आणि रेल्वेचं आयत्यावेळी बुकिंग मिळणं हे कठिण होऊन होतं. त्यामुळे कोकणवासीयांसाठी कोकणात जाणं सुलभ व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. शनिवार (20 ऑगस्ट) रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या नेत्यांसोबतच पक्षाचे इतर पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. तसेच याच बैठकीमध्ये या निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. यामध्ये अद्याप ऑनलाईन बुकिंवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन बुकिंग नसणार आहे. तसेच या सुविधेसाठी मिळणारा प्रतिसाद पाहून ऑनलाईन बुकिंवर निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर मार्गी गेल्यास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि इतर टोल नाक्यांवरील 600 ते 700 रुपयांचा टोल माफ होणार आहे. यासाठी मुंबई शहरासोबत पालघर येथील नागरिकांना जवळच्या पोलीस स्थानकातून आरटीओकडून पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai