कामोठ्यात 14 वा मल्हार जॉब ड्राईव्ह

 पनवेल ः आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हार रोजगारच्या माध्यमातून शनिवार 08 डिसेंबर रोजी कामोठ्यात ‘14 वा मल्हार जॉब ड्राईव्ह’ आयोजित करण्यात आला आहे. कामोठ्यातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत हा मेळावा होणार असून दहावी ते पदवीधरांसाठी रोजगाराची संधी मिळणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने युवकांना नोकरीची स्वप्ने पूर्ण करता येणार आहेत. उमेदवारांसाठी बायोडाटाच्या पाच प्रती, पासपोर्ट आकाराचे फोटो, रहिवासी पुरावा आवश्यक असून नोंदणी आणि अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9029404666 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.