स्वच्छ हवेसाठी विविध उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 09, 2023
- 293
नवी मुंबई ः 7 सप्टेंबर हा दिवस निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जगभरात साजरा केला जात असून नवी मुंबई पालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आयुक्तांच्या सूचनांनुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिमा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग कार्यालयांप्रमाणेच पर्यावरण प्रयोगशाळा, अग्निशमन केंद्रे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळ अशा विविध ठिकाणी वायु प्रदूषण टाळण्याची तसेच पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक यांनीही उत्साही सहभाग घेतला. यानिमित्त पालिका क्षेत्रात जनजागृतीपर फलक लावण्यात आले असून त्यावर प्रवास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, वाहन खरेदी करताना व प्रवास करताना इलेक्ट्रिकल वा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यावे, नियमितपणे पीयूसी तपासणी करावी, युलू जन सायकल तसेच ई बाईक सहभाग प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, बांधकामाचा राडारोडा पालिकेच्या सी अँड डी वेस्ट प्रकल्पाला हस्तांतरित करावा, असे विविध जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत शहराची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम व प्रकल्प राबवित असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन ठेवून या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai