खड्ड्यांच्या तक्रारींसाठी येणार ॲप
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 09, 2023
- 478
नवी मुंबई : महामुंबईतील सर्व महापालिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुुंबई उच्च न्यायालयाने या सर्व पालिका आयुक्तांना खडे बोल सुनावले होते. या सुनावणीनंतर जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्ड्यांच्या तक्रारी ऐकून ते बुजविण्यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ॲप कसे असावे, त्याची अंमलबजावणी कशी करावी, ॲप विकसित करण्यासाठी आवश्यक ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर करण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व बांधकाम विभागाच्या सचिवांसह कोकण विभागाचे मुख्य अभियंता यांचा समावेश आहे. या समितीने सर्व अभ्यास करून दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आले आहे. ॲपसह त्यात आणखी काय नवीन हवे, कोणते बदल हवेत, याचे अधिकार या समितीला दिले आहेत. त्यानंतर या समितीच्या अहवालानंतर हे ॲप विकसित करण्यात येणार आहे. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी ऐकून ते बुजविण्यासाठी जे ॲप तयार करण्यात येणार आहे, त्यासाठीच्या समितीला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai