उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 09, 2023
- 382
मुंबई : 2014 मधील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही म्हणून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल खटला शुक्रवारी फेटाळण्यात आला.न्या. संग्राम जाधव यांनी हा निर्णय दिला. नागपुरातील ॲड. सतीश उके यांनी हा खटला दाखल केला होता. फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी प्रलंबित दोन प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम 125-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे उके यांचे म्हणणे होते. फडणवीस यांच्या वतीने वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी यांनी तर, उके यांनी स्वत:च बाजू मांडली. यासंदर्भात गुन्हा करणाऱ्या उमेदवाराकरिता सहा महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai